

Thane To Bhiwandi Metro
ESakal
भिवंडी : ठाणे ते भिवंडी यादरम्यान मेट्रो-५ (ऑरेंज लाइन) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण होतील. त्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते, असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला. भिवंडी महापालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.९) शहरात संयुक्त पाहणी दौरा केला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.