Thane News: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद, राज्य सरकारचा निर्णय; कसा असेल प्रकल्प?

Thane Zoo Project: मुंबईतील जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारले जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Thane Zoo

Thane Zoo

ESakal

Updated on

ठाणे : मुंबईतील जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर आरक्षित जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सुरुवातीला १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना शहरातच निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा अनुभव घेण्यासाठी नवे आकर्षण उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com