Thane News : ...अखेर तो कट खुला

ठाणे शहरातील वाहूक कोंडी सोडविण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी, शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते.
Bjp and shivsena
Bjp and shivsenaesakal

ठाणे - ठाणे शहरातील वाहूक कोंडी सोडविण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी, शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यात कपूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा कट देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे ढोकाळीकडे जाण्यासाठी हायलंड वरून वळसा मारून जावे लागत होते.

याविरोधात नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर अखेर हा कट पुन्हा सुरु करण्यात आला आहे. असे असले तरी हा कट आमच्या पाठपुराव्यामुळे सुरु झाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे गट व भाजपकडून करण्यात आला असून या कट खुला करण्यावरून दोघांमध्ये श्रेयवादाचा राजकीय शिमगा रंगला आहे.

दिड वर्षापूर्वी ठाणे शहरात वाहतुक कोंडीवर उपाय करण्यासाठी सुमीत बाबाने मोहीम हाती घेतली होती. मात्र हि मोहीमच फसल्याचे चित्र सध्याच्या घडीला शहरात होणाऱ्या वाहतूक कोन्दिवरून दिसून येत आहे. त्यात कापुरबावडी पुला खालून कोलशेत ढोकाळी कडे जाणारा मार्ग देक्घील वाहतूक कोंडी सोडविण्याचे कारण देत, बंद करण्यात आला होता.

त्यामुळे वाहनांना थेट माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीवरुन हायलॅन्ड मार्गे कोलशेत ढोकाळीकडे जावे लागत होते. त्यामुळे ढोकाळी नाक्यावर वाहनांची संख्या वाढून सांयकाळ पासून वाहतुक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरु करावा, यासाठी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदे सेनेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा दोघांकडूनही केला गेला आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी १२ वाजता जेसीबीच्या सहाय्याने येथील कट खुला करण्यात आला. यावेळी शिंदे सेनेच्या पदाधिकारी यांच्याकडून वचनपूर्ती केल्याचे सांगितले जात आहे. तर, भाजपकडून आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये हा कट खुला करण्यावरून श्रेयावाद रंगल्याचे दिसून आले.

या संदर्भात, माजी स्थायी सामिती सभापती संजय भोईर यांना विचारले असता, मागील एक वर्षापासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते वाहतुक पोलिसांकडे पाठपुरावा करीत होतो. त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा कट खुला करण्यात आला आहे. प्अरत्सायेक वेळी आम्ही मेहनत करत असतो आणि आमदार केवळ श्रेय घेण्यासाठी येत असतात, असा आरोप देखील संजय भोईर यांनी केला.

आम्ही हा कट खुला करण्यासाठी जे काही केले, त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यामुळे, आम्ही काय केले हे कुणी सांगू नये. हा कुट खुला करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. येथील सोसायटीधारकांनी देखील आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु दप्तर दिरंगाईमुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. अखेर हा कट खुला झाला असल्याने पाठपुराव्याला यश आले.

- संजय केळकर, आमदार, भाजप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com