ठाण्यातील ६६ ग्रामपंचायतींत कोरोनाचा विळखा सैल; पाचपेक्षा कमी रुग्णांची नोंद | Thane corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Fight

ठाण्यातील ६६ ग्रामपंचायतीत कोरोनाचा विळखा सैल; पाचपेक्षा कमी रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (thane) जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोनाने (corona) हाहाकार उडवून दिला होता. त्यात शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित रुग्णांसह (corona patients) मृत्यूचा आकडा (corona deaths) वाढला होता. कोरोनामुळे भीतीदायक परिस्थिती असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींत योग्य खबरदारी घेतल्यामुळे (corona precautions) कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पाचपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरले असानाना, या ६६ ग्रामपंचायतींत (corona free gram panchayat) कोरोनाला थाराच मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस

मार्च २०२० मध्ये कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांची संख्या बघता बघता लाखोंच्या घरात गेली तर, मृतांच्या संख्येने देखील हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे या आजाराबाबत नागरिकांच्या मनात कमालीची भीती होती. सुरुवातीच्या काळात हा आजार नवा असल्याने यावरील उपचारपद्धती अवगत नव्हती. उपचार करायचे कसे आणि कोणते, या विचारात आरोग्य विभाग होता. त्यावेळी केवळ काळजी घेणे, घराबाहेर पडणे टाळणे, मस्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत होते.

ठाणे जिल्ह्यात मागील तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यात रुग्णसंख्येसह मृत्यूच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आली असून, अनेक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासह शिरकाव होऊ नये यासाठी काटेकोर नियमांचे पालन केले. त्यात गावकऱ्यांनी देखील या साथीविरोधात एकवटून लढा दिल्याने जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पाचपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली.

हेही वाचा: कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

जनजागृतीचा सकारात्मक परिणाम

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आणि उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा (कोरोनामुक्त गाव) लावण्याची नवी क्लृक्ती लढवली. तसेच आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोना आजाराचे गांभीर्य, त्यांचे परिणाम आदींची नागरिकांना देण्यात आलेल्या माहिती व या आजाराबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागात झाला. या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायती या कोरोनापासून दूर राहिल्या.

पाचपेक्षा कमी रुग्णा सापडलेल्या ग्रामपंचायती
तालुका संख्या
अंबरनाथ ०२
भिवंडी ०६
कल्याण ०२
मुरबाड ४२
शहापूर १४

loading image
go to top