पालकमंत्री को गुस्सा क्यो आता है..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी ठाण्यात आणखी आयएस अधिकाऱ्याचा आग्रह, पालकमंत्री एकनाथ शिंदे या मागणीवर सकारात्मक  ?

ठाणे, ता.  15  ः ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य सेवेबरोबर अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी मुंबईत ज्या पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात पाच आयएस अधिकारी घेण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही तीन अतिरिक्त अधिकारी घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱयासह भाजपाच्या आमदारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

अतिरिक्त आययएस अधिकाऱ्यांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील सकारात्मक असल्याची चर्चा आहे. घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, कळवा मंुब्रा अशा विभागानुसार नव्याने येणाऱ्या आयएस अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी लागणार असल्याने हा विषय पालकमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे हा विषय कधी उपस्थित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सावध व्हा ! कोरोनानंतर मुलांना होतोय 'कावासाकी' आजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

शहरातील आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवरुन एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकायांसह आरोग्य विभागातील अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. महामारीच्या काळात आरोग्य सेवेत नव्याने वस्तू घेण्यासाठी कागदी घोडे किती वेळ नाचविणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या बैठकीला महापौर नरेश म्हस्के यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि महापालिकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी महापालिकेकडून सुरु असलेल्या ठिसाळ कारभाराबाबत अनेकांनी तक्रारी केल्या.

ऍम्ब्युलन्स वेळेत न मिल्ने हा प्रमुख विषय या बैठकीत चांगलाच गाजला. महापालिकेकडून RTOच्या परवानगी बाबत सांगण्यात आले. परंतु हे कारण अतिशय चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोरोना बाधीत रुग्णांचे सुरु असलेले हाल, भाईंदर पाडा येथे क्वॉरान्टाइन करुन ठेवण्यात आलेल्यांना वेळेत सुविधा उपलब्ध न होण्यावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर यावेळी ऍम्ब्युलन्सचे वाढीव दर, खाजगी रुग्णालय आणि हॉटेलवाल्यांकडून सुरु असलेली लुट आदी तक्रारी उपस्थित केल्या.

'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

कागदी घोडे नाचवणे बंद करुन रुग्णांना उपचार कसे लवकर मिळतील, रुग्णवाहीका तत्काळ उपलब्ध करुन द्यावात, क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अब्युलेन्सचे दर जे निश्चित केले आहेत, त्यानुसार ते घेण्यात यावेत, खाजगी रुग्णालय आणि हाॅटेलची लुट बंद करा अशा सुचनाही त्यांनी केल्या. तसेच या बैठकीत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही तात्पुरत्या स्वरुपात आयएस अधिका:यांच्या नेमणुका कराव्यात अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

दरम्यान ही बैठक झाल्यानंतर शिवसेनेच्या काही जेष्ठ नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेऊन कोरोनावर आळा घालण्यासाठी चांगल्या अधिका:यांची फौज ठाणेकारणांसाठी, अशी मागणी केली. तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहरासाठी, वागळे लोकमान्य, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदींसाठी आयएस अधिका:यांच्या तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन या नगरसेवकांना दिल्याची माहिती सुत्रंनी दिली.

काय चाललंय काय ? मुंबईत पुन्हा एकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, तीन पोलिस गंभीर जखमी 

फायलीत वेळ घालवू नका - एकनाथ शिंदे

फायली तयार करण्यात वेळ घालवू नका. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्णांवर वेळच्यावेळी उपचार होणे महत्त्वाचे आहे. परंतु, अनेक ठिकाणी वेळच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असून त्याची गंभीर दखल शिंदे यांनी घेतली. तातडीने दहा रुग्णवाहिका कंत्राटी पद्धतीने दाखल करून घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना दिले. तसेच, बाधित रुग्णांवर उपचार करत असतानाच काँटॅक्ट ट्रेसिंग आणि तपासण्यांकडे जराही दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. फीवर ओपीडी मोबाइल दवाखान्यांची संख्या वाढवा, मृत्यूदर कमी करण्यासाठी वैद्यकीय पूर्वइतिहास असलेल्या वरिष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले. लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घ्या. स्थानिक नगरसेवक व पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करून विभागवार लॉकडाउनची कठोर अमलबजावणी करा, असे आदेश शिंदे यांनी दिले.

thane covid cases increasing day by day guardian minister eknath shinde angry over loopholes in the system


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane covid cases increasing guardian minister eknath shinde angry over loopholes in the system