

Summary
कट रचून दोघांनी किशनचा दोरीने गळा दाबून खून केला.
मृतदेह चादरीत गुंडाळून बदलापूरमधील नदीत फेकून देण्यात आला.
आरोपी दोघे फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
ठाणे जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ४४ वर्षीय पुरूषाची त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत.