
Khadakpada police Mocca action
ESakal
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकी-टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुफारान शेखसह टोळीतील तब्बल 17 जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला असून, अमली पदार्थ तस्करीविरोधातील ही कारवाई पोलिसांसाठी ‘माइलस्टोन’ ठरली आहे.