Thane: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

Thane Crime: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याप्रकरणी आरोपी ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच अधीक्षिकेवरही विनयभंगाची तक्रार दडपल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 crime

crime

ESakal

Updated on

शहापूर : तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपल्याचा ठपका अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवला असून या घटनेला त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तर मुलींचा विनयभंग करणारा स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत गवळी याला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, अशाच गुन्ह्यातून गवळी याची निलंबित होण्याची ही दुसरी वेळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com