

Thane Theft Case
ESakal
ठाणे : मसाज करताना वृद्धेला झोप लागल्याची संधी साधून तिच्या घरातून सोन्याची अंगठी आणि सोन्याची चेन, असे एकूण एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल नाका परिसरात घडली. याप्रकरणी मसाजसाठी आलेल्या महिलेवर चोरीचा संशय घेण्यात आला असून, वृद्धेने राबोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.