
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शोध पथकाने धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थांसह विविध साहित्य हस्तगत करत मुख्य आरोपीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे नेतृत्वाखाली १ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प ३ मधील इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ करण्यात आली.