
दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांनी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला मोठा चोरकप्पा तयार केला. त्यातून विदेशी दारूचा पुष्पा चित्रपटातील चंदन तस्करी स्टाईलने गोरख धंदा सुरू केल्याचे एका कारवाईतून उघडकीस आले आहे.
मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील कल्याणच्या भरारी पथकाने विदेशी दारूच्या तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे साडेपाच लाखांचा दारूसाठा जप्त करत एकाला ताब्यात घेतले.