
मुंबईः ठाण्यातील शिवाई नगर येथील लक्ष्मीनारायण सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणात अनेक वर्षे जुनी वृक्षांची तोड करण्यात येत आहे. या संदर्भात ठाणे महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही दाखल घेण्यात येत नसून अद्यापही या संदर्भात कोणतीही कठोर कारवाई देखील करण्यात आली नाही. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या विरोधात स्थानिक महिला नागरिक एकवटल्या असून त्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी केवळ 17 झाडे तोडण्याची परवानगी असताना, 50 झाडे कशी तोडण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर विभागातील शिवाईनगर परिसरातील लक्ष्मीनारायण सोसायटीच्या मागील मोकळ्या भूखंडावर विकास कामे करण्यात येत आहे. त्यासाठी मागील आठ ते दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड करण्यात येत आहे. या संदर्भात स्थानिक महिला नागरिकांनी ठाणे महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने वृक्ष अधिकारी यांनी संबंधित ठिकाणी जावून अवघे दोन मिनिटे पाहणी केली. मात्र, सुरु असलेली वृक्ष तोड थांबविण्याबाबत कोणत्याही सूचना त्यांनी दिल्या नसल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केली. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पामध्ये अनेक झाडे बाधित होत आहेत. त्यापैकी 17 झाडे तोडण्याची परवानगी असताना 50 झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करीत स्थानिक महिला नागरिकांनी केला. शुक्रवारी या विरोधात झाडे तोडण्यात येत असलेल्या लक्ष्मीनारायण सोसायटीच्या मागे धरणे आंदोलन करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्या मंजुषा पवार यांनी कोणतीही परवानगी आणि कोणतीही पाहणी करण्यात आली नाही. तसेच परवानगी घेण्यात आलेल्या झाडांव्यतिरिक्त इतर झाडे देखील तोडण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत महापालिका कोणतीच माहिती देत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे त्यांना वृक्ष अधिकारी ह्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे देखील पवार यांनी सांगितले.
लक्ष्मी नारायण सोसायटीच्यामागे मोकळ्या जागेवर करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झाडांपैकी 17 झाडे ही तोडण्यात येणार असून 49 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व रितसर परवानग्या देण्यात आल्या असून त्यासाठी लागणारा वृक्ष निधी देखील संबंधितांकडून भरण्यात आला आहे.
अलका खैरे, वृक्ष अधिकारी, ठामपा.
-----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Thane cut down 50 trees women citizens against Department of Tree Authority
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.