मेघनाने जिमला जाण्यापूर्वी वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या आणि....

मेघनाने जिमला जाण्यापूर्वी वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या आणि....

मुंबई - आपलं वजन, आपला रंग, आपलं दिसणं खरंच महत्त्वाचं नाहीये हो. आपण करत असलेली मेहनत, आपल्यातील सच्चेपणा याच गोष्टी आयुष्यात आपल्याला पुढे घेऊन जात असतात. आपल्या आयुष्यात कामी येत असतात. पण अनेकांना आपल्या वाढलेल्या वजनाचा किंवा अगदी कमी वजनाचा, आपल्या रंगाचा, आपल्या केसांचा आपल्या लुक्सचा न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड घेऊन जगत असताना असे तरुण-तरुणी नाहीते पाऊल उचलतात आणि होत्याचं नव्हतं होतं. 

अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यात घडलीये. मेघनाने वजन कमी करण्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि अवघ्या १५ तासातच तिचा मृत्यू झाला. मेघना अवघ्या २२ वर्षांची होती.  मेघना एक उत्तम नृत्यांगना होती, एका जिममध्ये ती इन्स्ट्रक्टर म्हणून काम देखील करत होती. वजन कमी करण्यासाठी ती गोळ्या घ्यायची. काही गोळ्यांवर सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र आपलं वजन कमी व्हायलाच हवं या हट्टापायी तिचा लाख मोलाचा जीव गेलाय.   

नक्की काय झालं ? 

मेघनाने त्या दिवशी जिममध्ये जायच्या आधी वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या. बंदी असलेल्या गोळ्या खाल्ल्यानंतर लगेचच तिला हायपरथर्मियाचा त्रास व्हायला सुरवात झाली. तिला गोळ्या खाल्ल्यानंतर उलटीचा त्रास सुरु झाला. तिच्या शरीराचं तापमान कमालीचं वाढलं. हृदयाचे ठोके वाढलेत, रक्तदाब वाढला. ती घराजवळच अससेल्या डॉक्टरांकडे देखील गेली. डॉक्टरांनी तिला सायन रुग्णालयात हलवलं. गोळ्यांचा भयानक त्रास होत असल्याने तिला ICU मध्ये ठेवण्यात आलं. मात्र या गोळ्यांमुळे तिला कार्डिएक अरेस्ट आला आणि तिने तिथेच अखेरचा श्वास घेतला. अवघ्या काही तासात मेघनाचा जीव गेला.  

याबाबत ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बंदी असलेल्या गोळ्या कुठून विकत घेतल्या गेल्यात याबाबत तपास सुरु आहे. 

Thane dancer dies due to cardiac arrest after taking banned weight loss pills

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com