निवडणुकांसाठी भाजप जोमाने लागली कामाला, भाजप इलेक्शन मोडवर..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मुंबई - कल्याण डोंबिवली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्‍टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहेत. मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुलाबी रस्त्याच्या पाहणीच्या निमित्ताने येऊन गेले. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी कल्याणकरांना शंभर कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत अठरा मुद्दृयांवर चर्चा केली.

मुंबई - कल्याण डोंबिवली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्‍टोबर महिन्यात होणे अपेक्षित आहेत. मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुलाबी रस्त्याच्या पाहणीच्या निमित्ताने येऊन गेले. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी कल्याणकरांना शंभर कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत अठरा मुद्दृयांवर चर्चा केली.

मोठी बातमी - प्रेमाला बहर द्यायचा असेल तर राशीनुसार 'या' रंगाचे टेडी द्या गिफ्ट!

प्रशासनाची कामाची गती संथ असल्याने एनडीए सरकारच्या काळात विविध कामांसाठी निधी दिल्यानंतरही येथे कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. एकंदरीतच शिवसेनेपाठोपाठ भाजपही इलेक्‍शन मोडवर असल्याचे दिसते. 
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, कोपर येथील रेल्वेचे पुलाचे काम तातडीने करणे, डोंबिवली येथील सुतिकागृहाचे काम त्वरित सुरु करणे, 27 गावातील पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेच्या कामाला गती देणे, डोंबिवली पूर्व-पश्‍चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला लगतच्या रस्त्यांची कामे तसेच म्हसोबानगर वरुन जाणाऱ्या एलिवेटेड ब्रिजच्या रखडलेल्या कामाची निविदा काढणे, डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंगला प्लाझा तसेच कार्यालयांची व्यवस्था यासह विविध कामांचा आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला. कोपर येथील उड्डाणपुलाचे काम अत्यंत दादाडीजे असल्याने आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात कलम 67 नुसार या पुलाचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

मोठी बातमी -  एक 'किस' तुम्हाला पाडू शकेल आजारी, भयंकर आजारी...

युतीच्या सरकारने डोंबिवली सूतिका गृहासाठी सात कोटी रुपयांचा निधी पालिकेला दिला होता. या ठिकाणी बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर रोटरी क्‍लब सुतिकागृहाची बांधणी करण्यास तयार आहे, मात्र प्रशासन हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही चव्हाण म्हणाले. डोंबिवली पूर्व पश्‍चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या म्हसोबानगरवरून 90 फूट रस्त्याला मिळणाऱ्या एलिव्हेटेड ब्रीजच्या कामामुळे बाधित होणाऱ्यांना बीएसयुपीतील घरे मिळावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोठी बातमी -  क्लब वेट्रेस ते ऑस्कर विजेती, 'ही' कहाणी आहे अभिनेत्री 'रेनी झेल्विगर'ची...

मागील सहा वर्षापासून या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा निर्णय रखडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या जागेवर पार्किंग प्लाझा तसेच कार्यालयांची व्यवस्था करण्याच्यादृष्टीने निविदा काढण्यात आली होती. तांत्रिक कारणाने या निविदेलि प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या काळात प्रशासनानेही हा विषय महासभेसमोर आणला नाही; त्यामुळे आजही हा विषय प्रलंबित राहिला आहे याकडे चव्हाण यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. 

मोठी बातमी -  'म्हणून' तुमचे पैसे वाचतायत; कोरोनाचा जगावर असाही परिणाम...

केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली पालिकेला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच दलित वस्तीसाठी दहा कोटींचा राखीव निधीही देण्यात आला आहे. मात्र या निधीचा वापर करून शहरातील कामे सुरु करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. रिंग रोडला आवश्‍यक असलेल्या जागेच्या भूसंपादन प्रक्रियेत गती आणण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्ण होईल अशी अपेक्षा यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे डोंबिवली शहरातील मच्छी मार्केट, शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन कक्ष यांसारख्या विषयांकडे ही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिका क्षेत्रातील कचरा उचलला जातो की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिका क्षेत्रात सर्विलंन्स कॅमेरे लावावेत असा आग्रह त्यांनी केला. पालिका क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने तत्कालीन राज्य सरकारने आरोग्य विभागाची आस्थापना सूची मंजूर केली होती; त्यावर पालिका प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे असेही चव्हाण म्हणाले. अधिवेशनापूर्वी पालिका प्रशासनाने या सर्व विषयांमध्ये गतीने काम करावे अन्यथा पक्ष म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मोठी बातमी -  हिंगणघाटातील पीडितेच्या मृत्यूनंतर अजित पवार 'शिक्षेबद्दल' म्हणालेत..

भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी मागील महासभेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष म्हणून यावर काय भूमिका घ्यायची आहे याबाबत वरीष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. 

राज्यात सत्तेत असताना या विषयांपैकी अनेक विषयांवर प्रत्यक्ष भेट घेऊन अथवा बैठका घेऊन चर्चा करण्यात आली होती. राज्य सरकार म्हणून जबाबदारी उचलून अनेक कामांमध्ये पालिकेला निधीही मिळवून दिला होता. मात्र पालिका प्रशासन या कामांना गती देण्यात अपयशी ठरले आहे.- रविंद्र चव्हाण, आमदार, डोंबिवली  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp once again on election mode check detain news about KDMC election