

Thane Data Center Project
ESakal
ठाणे : ठाण्यातील टीडीआर प्रकरणाचा वाद शांत होत नाही, तोच अॅमेझॉनच्या प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बाळकुम परिसरातील या प्रकल्पासाठी पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ठाणेकरांचे हक्काचे पाणी दिले जाणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण, उष्णता वाढ आणि पर्यावरणीय परिणामही होणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. या प्रकल्पाविरोधात महासभेत तसेच जनआंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारण्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.