चिंता कायम : ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 33 नवे रुग्ण, तर दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

ठाणे पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. 25) एकाच दिवसात 11 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. 25) एकाच दिवसात 11 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी 9 तर, कल्याण डोंबिवलीत 3 तसेच ठाणे ग्रामीण मध्ये एका रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 615 वर पोहोचला असून, आता पर्यंत 19 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नक्की वाचा : आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...

दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठाणे,  कल्याण-डोंबिवली,  नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या शहरी भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात या प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात चाळी व दाटीवाटीच्या वस्त्या आहेत. त्यामुळे शहरांमध्ये कोरोनाबाधीतांचा वाढणारा आकडा ही चिंतेची बाब ठरत आहे. 

हे ही वाचा : अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

महापालिका क्षेत्र - आजची संख्या (कोरोनाबाधित) - एकूण 

  • ठाणे महापालिका - 11  -  209
  • कल्याण – डोंबिवली महापालिका - 03  - 117
  • नवी मुंबई महापालिका - 09 - 112 
  • मीरा भाईंदर महापालिका - 09 - 129
  • भिवंडी महापालिका - 00 - 07 
  • उल्हासनगर महापालिका - 00 - 02 
  • अंबरनाथ नगरपालिका - 00 - 04
  • बदलापूर नगरपालिका - 00 - 16
  • ठाणे ग्रामीण - 01 - 17
  • एकूण - 33 - 615

 In Thane district, 33 new patients died in 24 hours, while two died


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane district, 33 new patients died in 24 hours, while two died