आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

खारघर परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिस आता ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने लक्ष ठेवणार आहे.

खारघर, ता. 25 : खारघर परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिस आता ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने लक्ष ठेवणार आहे.

सध्या लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून जनतेला घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहा, आपण व आपल्या कुटुंबांना सुरक्षित ठेवा, शासनाचे नियम पाळा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊन प्रभावीपणे राबवण्यासाठी अशा नागरिकांवर नजर ठेवण्याकरिता खारघर पोलिस संपूर्ण खारघर परिसरात ड्रोनच्या साह्याने नजर ठेवणार आहे. 

विनाकारण जे नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतील किंवा विनाकारण वाहन चालवताना दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून एक ते दीड किलोमीटर परिसरावर नजर ठेवली जाणार असून सेक्टरनिहाय पाहणी केली जात आहे. -प्रदीप तिदार, पोलिस निरीक्षक. 

महत्त्वाच्या बातम्या : 

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

पाकिस्तानी अधिकाऱ्यालाही 'या' भारतीय वैमानिकाचं कौतुक करण्यावाचून राहवलं नाही, वाचा असं काय घडलं...

अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करायचंय, आहो अशी करा ना मग सोनं खरेदी...

unnecessary roaming outside beware of drones of cops lock down security 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnecessary roaming outside beware of drones of cops lock down security