चिंता कायम ! ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 74 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 800 पार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

जिल्ह्यात ठाणे पलिके पाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत देखील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ठाणे : जिल्ह्यात ठाणे पलिके पाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत देखील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी (ता.  28)  केवळ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 41 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ठाणे शहरात 15, कल्याण - डोंबिवलीत 6, भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी 1, बदलापूरमध्ये 2, मीरा भाईंदरमध्ये 5 आणि ठाणे ग्रामीण मध्ये 3 अशा एकूण 74 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 802 वर पोहोचली आहे. 

महत्वाची बातमी :चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव

दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या शहरी भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात या प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात चाळी व दाटीवाटीच्या वस्त्या आहेत, त्यामुळे याठिकाणी धोका अधिक असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. 

मोठी बातमी गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक

मंगळवारी नवी मुंबई पालिका क्षेत्रात 41 नवे रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्णांची संख्या 188 वर पोहोचली आहे. ठाणे पालिकेच्या हद्दीत 15 नव्या रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या 256 वर पोहोचली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत 6 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने रुग्णांची संख्या 143 वर गेली. तर, उल्हासनगर पालिका क्षेत्रात एका रुग्णाची नोंद झाल्याने तेथील आकडा 3 वर पोहोचला आहे. तर, बदलापूरमध्ये 2 बाधित नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा 22 वर पोहोचला आहे. तर, मीरा भाईंदरमध्ये 5 रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांचा आकडा 152 वर पोहोचला आहे. तर, भिवंडीत देखील एका रुग्णाची नोंद झाल्याने तेथील बाधितांची संख्या 12 झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ही 3 नव्या रुग्णांमुळे बाधितांचा आकडा 21 वर गेला आहे.

In Thane district 74 new patients in 24 hours, the number of corona patient has crossed 800


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane district 74 new patients in 24 hours, the number of corona patient has crossed 800