

Thane District Court bomb Threat
ESakal
ठाणे : काही दिवसांपूर्वी मुंबईतील महापौर कार्यालय, मुंबईतील शाळा तसेच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या धमकीमुळे सर्वत्र एकच खळबळ पसरली होती. या धमकीला महिना देखील उलटला नसताना आता ठाणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.