
Thane: ड्रग्ज, एमडी, गांजा यांसारखे अमली पदार्थ बाळगाणाऱ्यांवर कठोर कारवाई करणाऱ्या राज्यातील सुरक्षा यंत्रणेने भांगेची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांना मात्र ठाणे, पालघर जिल्हा आंदण दिल्याची शंका येत आहे.
शालेय विद्यार्थी, तरुणाई आणि कष्टकरी कामगारांना आपल्या विळख्यात घेणाऱ्या या अमली पदार्थावर बंदी असतानाही तो औषधी दुकानांपासून थेट टपऱ्यांवर सर्रासपणे मिळत आहे. अवघ्या पाच रुपयांत सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या भांगेच्या गोळीच्या नशेने शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या काळ्या धंद्यात एकट्या ठाणे जिल्ह्यात दिवसाला सुमारे एका कोटीची उलाढाल होत असून, संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र किती चिंताजनक असेल याची कल्पना येते.