

DFCCIL Project
ESakal
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील रेल्वे व रस्ते वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा ठरणाऱ्या डीएफसीसीएल (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा प्रशासनाने पूर्ण केला आहे. मोठा गाव परिसरातून डीएफसीसीएल मार्गावर सोमवारी (ता. २२) घेण्यात आलेली रेल्वेची प्राथमिक चाचणी यशस्वी ठरल्याने ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील मालवाहतुकीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.