Thane News : यंदा पालिका क्षेत्रातील नाले सफाई वेळेत होणार; ९ प्रभाग समिती क्षेत्रातील नाले सफाईची कामास मंजुरी

पावसाळ्याच्या कालावधीत ठाणे शहरातील विविध भागातील नाले व गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण होत असतो तर, लोकवस्तीत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असते.
thane drainage cleaning on time 9 ward samiti work approve tmc
thane drainage cleaning on time 9 ward samiti work approve tmc Sakal

ठाणे : पावसाळ्याच्या कालावधीत ठाणे शहरातील विविध भागातील नाले व गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण होत असतो तर, लोकवस्तीत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असते.

हि बाब लक्षात यंदाच्या पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी ठाणे पालिकेने सावध भूमिका घेत, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या नाल्यांची सफाईच्या कामाची निविदा देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ठाणे पालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाला वेळेत सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

पावसाळ्याच्या काळात नाले सफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या तुंबण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने वेळेत नाले सफाई व्हावी यासाठी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे पालिका प्रशासनाने यंदाच्या २०२४ -२५ या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहान-मोठे नाले असे ३८४.९१ किमी नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे.

त्यासाठी ७ कोटी ९९ लाख ४३ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या नाले सफाईच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. मागील वर्षी पेक्षा यंदाचं वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा नालेसफाईची कामे बेलेत सुरु होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, नालेसाफीची कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येत असतो. ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे, तसेच खाडी परिसर असलेल्या कळवा,

माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत नाल्याची सफाई पालटुन यंत्राद्वारे केली जाणार आहे. तसेच नाले सफाईच्या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार असून नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण देखील करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

पालिका क्षेत्रातील अंदाजित नाल्यांची संख्या

ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com