esakal | ठाणे : उद्या शाळेचा पहिला दिवस..!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : उद्या शाळेचा पहिला दिवस..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्य सरकारच्या निर्देशानंतर ठाणे (Thane) जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या ४०० शाळा सुरू केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती सुभाष गोटीराम पवार यांच्या निर्देशानंतर शाळांमध्ये (School) तयारी सुरू करण्यात आली आहे. आरोग्यविषयक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयारी केली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यातील ४०४ हुन अधिक ग्रामपंचायती सप्टेंबरमध्ये कोरोनामुक्त झाल्या होत्या. राज्य सरकारने पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हापरिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या ४०० शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: जिल्हा दूध संघाचा ठराव बेकायदा : चांभारे

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या लसीकरणावर भर देण्यात आला होता. || आता शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. एखादा संशयित आजारी विद्यार्थी आढळल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचाराच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top