‘गडकरी’च्या शिल्पदुरुस्तीचे घोंगडे भिजत  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

गाजावाजा करत गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले; परंतु आजही ते पूर्ण झालेले नाही...

ठाणे - ठाण्याच्या नाट्य, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व राजकीय कारकिर्दीचा साक्षीदार असलेल्या गडकरी रंगायतनवरील तीन नाट्यकर्मींच्या शिल्पाचा काही भाग निखळल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले. परंतु वर्ष झाले तरी त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. तेव्हा नवीन सत्ताधारी तरी ते पूर्ण करणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

नाट्यसंमेलनापूर्वी शिल्पाची दुरुस्ती होणे अपेक्षित होते; परंतु वर्ष झाले तरी दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. १९७८ मध्ये ठाण्यात गडकरी रंगायतन बांधले. त्यावर राम गणेश गडकरींसोबत बालगंधर्व आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांची भव्य त्रिमूर्ती बसवली होती. यातील एका शिल्पाच्या चेहऱ्याचा भाग निखळला होता. परंतु त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी १९, २० आणि २१ फेब्रुवारीला येथे नाट्यसंमेलन झाले. त्या वेळी गाजावाजा करत दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु आजही ते पूर्ण झालेले नाही.

Web Title: Thane gadkari rangayatan