

Thane-Ghodbandar Road Repairs to be Completed by December 10
Sakal
ठाणे : ठाणे शहरातील व घोडबंदर मार्गावर प्रमुख समस्या रस्त्यांची असून खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती चांगली नाही. त्यावर तत्काळ उपाय करण्यासह एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी ही दुरुस्तीची कामे तातडीने, १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिले. घोडबंदररोड परिसरातील समस्यांवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी म्हस्के यांनी निर्देश दिले.