

Ghodbunder Road Closure
ESakal
ठाणे : शहरातील घोडबंदर मार्ग रविवार (ता. ७) रात्री १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. काजुपाडा ते फाउंटन हॉटेल मार्गादरम्यान ब्राऊटिंग आणि मास्टिंगचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता २४ तासांसाठी हा मार्ग जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. गायमुख घाटात हलक्या वाहनांची वाहतूक विरुद्ध दिशेने सुरू ठेवण्यात येणार आहे.