Thane Loksabha Result: शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!

Thane Loksabha 2024 Election Result Rajan Vichare Shivsena ubt Naresh Mhaske Shivena|राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा पराभव केला. राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ मतांनी विजयी झाले
 शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!
Thane Loksabha Result:sakal

ठाणे मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा शिवसेनेत फुट पडली आणि शिंदे ठाकरे गट निर्माण झाले. यामुळे मतांची विभागणी निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गट त्यांना धोबी पछाड देतो का ? की शिंदेच ठाण्याचे किंग राहतात? हे पाहण्याची उत्सूकता संपूर्ण राज्याला होती.(Thane general election results)

मात्र आता ठाण्यात नरेश म्हस्केंनी ८०००० मतांची राजन विचारेंचा पराभव केला आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. आघाडी मिळाली आहे.

या ठिकाणी ठाकरेंकडून मातब्बर नेते, तथा २ टर्म खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेनेने नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली. अशावेळी या ठीकाणी टफ फाइट होईल अशी आशा होती मात्र आता नरेश म्हस्केंनी विचारेंचा दणदणीत पराभव केला. (thane loskabha result)

Thane lok Sabha Election
Thane lok Sabha Election
 शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!
Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

2014 यावर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं. 2019 यावर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील ते वर्चस्व तसंच राहिलं.

2019 साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात आनंद परांजपे यांनी NCP कडुन निवडणूक लढवली. यावेळी राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा पराभव केला. राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ मतांनी विजयी झाले.

Thane lok Sabha Election
Thane lok Sabha Election

ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी मतदार संघ हा ठाणे लोकसभेमध्ये येतो. (Thane Lok Sabha Election Results)

याचबरोबर ओवळा माझीवडा हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांचा आहे. मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन ह्या आहेत. ठाणे शहरचे आमदार संजय केळकर आहेत. ऐरोली चे आमदार गणेश नाईक आहेत तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत.

Thane lok Sabha Election
Thane lok Sabha Election
 शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!
Naresh Mhaske Manifesto : नमो नम:ची छाप! नरेश म्हस्केंच्या वचननाम्यात सर्वसमावेशक विकासाची हमी

असं जरी असलं तरी ठाण्याचे विद्यमान खासदार हे राजन विचारे आहेत. एकनाथ शिंदेंप्रमाणेच राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. राजन विचारेंना मानणारा एक वर्ग ठाण्यामध्ये आहे. तर शिवसेनेचा किंवा ठाणेकरांचा असाही वर्ग आहे, ज्यांना एकनाथ शिंदे यांनी निवडलेला बंडखोरीचा मार्ग आवडला नाहीये. (Thane Lok Sabha 2024 Election Results)

हे लोक ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत. गणेश नाईक यांच्या विरोधातही काही प्रमाणामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यामुळे होणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल अशी आशा होती मात्र राजन विचारेंचा दणदणीत पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com