Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

ठाण्याची शिंदे सेनेकडं जाणार की भाजपकडं यावरुन बराच काळ चर्चा सुरु होती. पण शिंदेंनी ही जागा आपल्याकडं राखण्यात यश मिळवलं आहे.
Naresh Mhaske
Naresh Mhaske

नवी मुंबई : ठाण्याची शिंदे सेनेकडं जाणार की भाजपकडं यावरुन बराच काळ चर्चा सुरु होती. पण शिंदेंनी ही जागा आपल्याकडं राखण्यात यश मिळवलं आहे. याठिकाणी काल नरेश म्हस्के यांना शिंदेंनी उमेदवारी दिली. पण आता म्हस्केंच्या उमेदवारीवरुन भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. (Against Thane Shivsena Candidate Naresh Mhaske displeasure in BJP 65 officials in Navi Mumbai resigned)

Naresh Mhaske
Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केलं आहे. यासाठी ते मुंबईतील भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यामध्ये ६४ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक हे इच्छुक उमेदवार होते. उद्या इथं उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. (Latest Marathi News)

Naresh Mhaske
Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

दरम्यान, या परिस्थितीवर नरेश म्हस्के यांनी स्वतः भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, गणेश नाईक, प्रताप सरनाईक आणि भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासोबत मी नाईकांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. पण त्यांनी मला काहीही चिंता करु नका नवी मुंबईतून तुम्हाला चांगला लीड मिळेलं, सर्वकाही मी पाहिनं काही अडचण असेल तर सांग असं आश्वासन त्यांनी मला दिलं. (Marathi Tajya Batmya)

Naresh Mhaske
T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

जे काही घडलं ते चुकीचं आहे. हे सर्व खोटारडे लोक आहेत आज महायुतीच्या भाजपचा विश्वासघात केला आहे. नवी मुंबईच्या सर्व जिल्हा कार्यकारिणीचा विश्वासघात केला आहे, अशी भावना नवी मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com