Thane News : तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस; नरेश म्हस्के यांचा जरांगे यांना ट्विटद्वारे इशारा

काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे. सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे.
manoj jarange patil and naresh mhaske
manoj jarange patil and naresh mhaskesakal

ठाणे - काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे. सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे. तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मनोज जरांगे पाटील यांना ट्विट करत दिला. तसेच कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे आवाहन देखील म्हस्के यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप देखील म्हस्के यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे, मराठा आरक्षण. तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला असा प्रश्न देखील म्हस्के यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला. मी पण एक मराठाच आहे, आरक्षणाचं महत्व जाणतो, तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असे नमूद करून म्हस्के यांनी आज जो आहेस, ते लोकांच्यामुळे आहेस. हे विसरून नको. तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस. कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस, असे आवाहन देखील म्हस्के यांनी ट्विटद्वारे केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com