

Thane Fire
ESakal
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात आगीची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एकामागोमाग तब्बल २३ वाहनांनी पेट घेतला असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीच्या घटनेमुळे झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.