Thane Accident :ठाण्यात मेट्रोच्या गर्डची लोखंडी प्लेट पडून पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Accident

Thane Accident :ठाण्यात मेट्रोच्या गर्डची लोखंडी प्लेट पडून पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू

ठाणे शहरातील कॅडबरी सिग्नलच्या परिसरात मेट्रो-४ प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा करूण अंत झाला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलच्या परिसरात असणाऱ्या उत्सव हॉटेलजवळ हा अपघात झाला आहे. एक महिला याठिकाणी रस्ता ओलांडत असताना मेट्रो प्रकल्पाच्या गर्डरची लोखंडी प्लेट थेट खाली कोसळली. अत्यंत जड वजनाची ही प्लेट महिलेच्या अंगावर पडली आणि ती खाली दबली गेली. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला

दुर्घटना झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली, त्यांनी महिलेला लोखंडी प्लेटखालून बाहेर खेचून काढले. स्थानिकांनी या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर राबोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. . ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा: Nashik Crime News : वाहन चोरट्यांचा शहरात सुळसुळाट! अंबडमधून स्कॉर्पिओ अन् 7 दुचाकींची चोरी

स्थानिक आणि पोलिसांनी मिळून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि तिला उपचारासाठी तात्काळ ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी या महिलेला मृत म्हणून घोषित केले. लोखंडी प्लेटच्या प्रचंड वजनाखाली दबून या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सध्या राबोडी पोलीस या घटनेचे सीसीटीव्ह फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: Mumbai Crime : मुंबईत पोलीस शिपायाला बॅटने मारहाण