

Thane Metro
ESakal
ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी, उद्घाटनाच्या घोषणा आणि वेळोवेळी बदलणाऱ्या डेडलाइन्स यामुळे ठाणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे सरकारकडून प्रकल्प वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी दुसरीकडे प्रत्यक्षात स्थानकांची अपूर्ण कामे, कारशेडचा रखडलेला प्रश्न आणि धूळखात असलेला ट्रायल रनचा डबा यामुळे ‘मेट्रो कधी धावणार,’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.