पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला मरेपर्यंत जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

ठाणे - हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला ठाणे सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 15 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील इतर चार जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्या. एस. सी. खलिपे यांनी हा निकाल दिला.

दंडाची रक्कम आरोपीच्या मुलांच्या संगोपनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी पती सदाफल यादव याचा 15 वर्षांपूर्वी मृत उषा हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सदाफल याच्या भावाच्या विवाहात त्याला मोठी रक्कम वधुपक्षाकडून मिळाली होती. त्यानंतर तो आणि त्याचे दोन भाऊ आणि दोन बहिणी हे उषा हिला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देऊ लागले. त्रासाला कंटाळून उषा हिने 2007 मध्ये धारावी येथे तक्रारही नोंदवली होती.

Web Title: thane mumbai news crime Life imprisonment punishment