esakal | ठाणे महापालिकेच्या डम्पिंगला भंडार्ली ग्रामस्थांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandarli villagers

ठाणे महापालिकेच्या डम्पिंगला भंडार्ली ग्रामस्थांचा विरोध

sakal_logo
By
शर्मिला वाळूंज

डोंबिवली : ठाणे शहराचा (Thane) कचरा टाकण्यासाठी ठाणे महापालिकेने (thane municipal) 14 गावातील भंडार्ली गावातील (Bhandarli village) 4 हेक्टर जागा भाडे तत्वावर (land on rent) घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांनी व 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच 14 गावांत प्रदूषणाची समस्या (pollution problem) मोठ्या प्रमाणात असताना ठाण्यातील घाण आमच्या गावात कशाला? आमचा या डम्पिंगला (Dumping) विरोध असून जर दखल घेतली गेली नाही तर समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आंदोलन (people Strike) करतील असा इशारा ग्रामस्थांनी रविवारी दिला.

ठाणे महानगरपालिकेने दिव्यातील डम्पिंग बंद करीत ते शहराबाहेरील 14 गावांतील भंडार्ली गावातील जागेवर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थ व विकास समितीने मात्र विरोध दर्शविला आहे. 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीची बैठक रविवारी नारीवली येथे पार पडली. यात गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणे, नळ पाणी पुरवठा योजना, टोरंटो वीजचा अनागोंदी कारभार, ठाणे महापालिकेचे गावांत होऊ घातलेले डम्पिंग या विषयांवर चर्चा झाली. यावेळी समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मोतीराम गोंधळी, सुखदेव पाटील, गुरुनाथ पाटील, ज्ञानेश्वर येंदारकर, चेतन पाटील यांसह अनेक मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात होऊ घातलेल्या डम्पिंगला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. याविषयी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले, ठाणे महापालिकेची घाण आमच्या 14 गावात आणण्याचा घाट घातला जात आहे. आमच्या सारखे दुर्दैवी दुसरे कोणी नाही. गावांत पिण्यायोग्य पाणी नाही. आरोग्य केंद्र नाही. हवा, जमिन, पाणी दूषित झाले आहे. त्यात आता डम्पिंग आणले जात आहे. इथे माणसं राहतात, की जनावरे? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ठाणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतच डम्पिंगला जागा शोधावी, इथे डम्पिंग आणण्याचा प्रयत्न केला तर सर्व ग्रामस्थ मोठे आंदोलन करतील.

हेही वाचा: मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

भंडार्ली गावचे ग्रामस्थ तथा माजी सरपंच कैलास पाटील म्हणाले, भंडार्ली गाव हे अगोदरच प्रदूषणाचे माहेरघर होऊन बसले आहे. येथील भंगाराची गोदामे, केमिकल पदार्थांचे साठे यामुळे नदी, नाले, जमिनी प्रदूषित होऊन ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले आहे. त्यात आता ठाणेचे डम्पिंग येथे आणले गेल्यास आमचे जगणे कठीण होईल. या परिस्थितिचा विचार करून प्रशासनाने ग्रामपंचायत हद्दीत कोठेही डम्पिंग लादु नये. सभेत मंजूर केलेला ठरावाला स्थगिती देण्यात यावी यासाठी नागावं ग्रामपंचायत स्तरावरून शासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही ग्रामस्थ एकत्रित आलो आहोत. सर्व पक्षिय विकास समिती आणि भंडार्ली ग्रामस्थांचे म्हणने ऐकले नाही तर तीव्र आंदोलन करीत डम्पिंगला विरोध करण्यात येईल असे सांगितले.

पालकमंत्र्यांनी समितीचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री दरबारी मांडावे

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावीत अशी मागणी गेले काही वर्षे 14 गाव सर्व पक्षिय विकास समितीने लावून धरली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत विकास कामे होत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूका न लढण्याचा निर्णय या समितीने घेतला असल्यानेनिवडणूकिवर बहिष्कार घालण्यात आला आहे. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी मांडावे अशी अपेक्षा आहे. मात्र पालकमंत्री भेटीसाठी वेळ देत नसल्याचे समिती अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top