

Thane municipal corporation
ESakal
ठाणे : महागाईच्या सापडलेल्या कचाट्यात ठाणेकरांच्या खिशावर आता महापालिकेच्या करवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. ठाणे महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेत निवासी मालमत्तांच्या करात १२ टक्के, तर बिगरनिवासी मालमत्तांच्या करात २० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच मालमत्ता हस्तांतरण शुल्काच्या पद्धतीत बदल करून शासनाच्या बाजारमूल्याच्या ०.५ टक्के शुल्क आकारण्यासही मान्यता देण्यात आली. त्यामुळे महागड्या मालमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारांचा खर्च वाढणार आहे.