

Allegations of ₹2560 Crore Scam in Gutter and Footpath Projects
Sakal
ठाणे: गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल ४ हजार ९५३ कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला. मात्र, त्यातील २ हजार ५६० कोटी रुपये फक्त गटार आणि पायवाटांवर खर्च करण्यात आले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसत नाहीत अशी शंका भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढून सखोल चौकशी करण्याची मागणी पेंडसे यांनी केली आहे.