Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

TMC Lake Development Plan: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार असून यामुळे नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार आहे. याबाबत महापालिकेने नवा प्लॅन तयार केला आहे.
Thane Lake Development

Thane Lake Development

ESakal

Updated on

ठाणे : ‘तलावांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांच्या कायापालटासाठी आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील १५ तलाव मासेमारी आणि बोटिंग सुविधेसह खासगी ठेक्याने देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर (महासभा) ठेवण्यात आला असून, यामुळे ठाणेकरांना मनोरंजनाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com