

Thane municipal corporation
ESakal
ठाणे : शहरात एकीकडे पुनर्विकास आणि नव्या बांधकामांचा वेग वाढत असताना दुसरीकडे पाण्याची उपलब्धता हे मोठे आव्हान बनण्याची चिन्हे आहेत. सुपर एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे ठाणे पालिकेने नवीन इमारतीच्या पाणीपुरवठ्याबाबत कठोर भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत 'ओसी' मिळालेल्या नवीन इमारतींना पालिकेकडून पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका विकसकांसह गृहप्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य ठाणेकरांनाही बसण्याची शक्यता आहे.