

Polling stations
ESakal
ठाणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदारांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रभाग क्रमांक २३ मधील चार मतदान केंद्रांचे स्थान बदलण्याचे आदेश जारी केले आहेत. आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.