

Thane municipal corporation
ठाणे : ठाणे महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहात यंदा केवळ राजकीय समीकरणेच नव्हे, तर नातेसंबंधांचाही खास गोतावळा पाहायला मिळणार आहे. पती-पत्नी, दीर-भावजय, सासू-सून, पितापुत्र आणि जावा-दीर अशा विविध कौटुंबिक नात्यांतून अनेक नगरसेवक सभागृहात दाखल होणार आहेत. एकाच कुटुंबातील चक्क चार जण नगरसेवक म्हणून पालिकेची पायरी चढणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे राजकारण यंदा ‘कुटुंबकेंद्रित’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.