

TMC General Body Meeting
ESakal
ठाणे : मागील तीन ते चार वर्ष प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीनंतर पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. पहिल्याच महासभेत प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांचा सविस्तर लेखाजोखा सादर करण्याची मागणी भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या तिने करण्यात आली. मात्र, चर्चा होणे अपेक्षित असताना, शिवसेन शिंदे गटाकडून हा विषय गुंडाळत, लक्षवेधीला बाळ दिल्याचे दिसून आले. यावर आक्रमक पवित्र घेतलेल्या भाजपसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मागणीला केराची टोपली दाखवत, अवघ्या दहा मिनिटांत पटलावरील १९ विषय मंजूर केल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला.