

Thane municipal corporation
ESakal
ठाणे : करवाढ आणि भाडेवाढीला फाटा देत ठाणे महापालिकेने मार्चमध्ये २०२६-२७चा अर्थसंकल्प सादर केला होता; मात्र अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच महापालिकेने मालमत्ता कराच्या दरात वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. निवासी मिळकतींच्या करात १२ टक्के, तर बिगर निवासी मिळकतींच्या करात २० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.