

Thane municipal corporation
ESakal
ठाणे : आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी ठाणेकरांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची तयारी केली आहे. तब्बल १० वर्षांनंतर मालमत्ता करात तसेच टीएमटीच्या बसभाड्यातही वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव १७ ऑगस्टला होणाऱ्या महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.