निवडणुका आल्या की धरणाची आठवण; आमदार संजय केळकर यांची टीका

sanjay kelkar
sanjay kelkarsakal media
Updated on

ठाणे : पालिका निवडणुका (thane municipal election) आल्या असल्याने जिल्ह्यातील दोन्ही मंत्री धरण-धरण करत असून नागरिकांना भूलथापा न मारता ठोस प्रस्ताव आणावा, असे आवाहन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर (mla sanjay kelkar) यांनी केले आहे. दरम्यान, त्यांनी एमआयडीसी (MIDC) आणि पालिका अधिकाऱ्यांची (Muncipal Authorities) बैठक घेऊन पाणीपुरवठा वाढवून (water supply) तो सुरळीत करावा, अशी मागणी करत आंदोलनाचा इशाराही (strike warning) दिला आहे.

sanjay kelkar
दहिसरच्या पेट पार्कचे नूतनीकरण; कुत्रे-मांजरांना मिळणार धमाल सोयी

सत्ताधारी शिवसेना ठाणे महापालिकेचे स्वतःचे धरण निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरली असून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काहीतरी करत असल्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे. ठाणे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सोसावा लागत असून टँकर माफिया, पाणी माफिया दिवा आणि घोडबंदर भागात जनतेची लूट करत असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

पाणी समस्येबाबत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन पाणीपुरवठा वाढवून देणे आणि तो सुरळीत करण्याची मागणी केली. यात अपेक्षित बदल दिसून आला नाही तर शहरभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com