
Thane Water Scarcity
ESakal
ठाणे : मागील दोन दिवसांपासून सलग होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली असली, तरीही ठाणेकरांना नवरात्रीच्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातील गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे गंभीर अडचण निर्माण झाली आहे. पंपिग स्टेशनमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. असे असले तरी त्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे यादरम्यान पाणीपुरवठा मंदावणार आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.