Thane News: 'आवास'चा मार्ग मोकळा! ठाणे महापालिका ३,०८४ घरे बांधणार; कोणाला मिळणार लाभ?

Pradhan Mantri Awas Yojana: ठाणे महापालिका पंतप्रधान आवास योजनेतील ३ हजार ८४ घरे उभारणार आहे. या प्रकल्पासाठी ७५० कोटी १३ लाखांची निविदा काढण्यात आली आहे.
Thane municipal corporation

Thane municipal corporation

ESakal

Updated on: 

ठाणे : दिवा परिसरातील बेतवडे येथे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील तीन हजार ८४ घरांच्या प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे, ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी ७५० कोटी १३ लाखांची निविदा काढली असून, पालिकेच्या माध्यमातून घरे बांधण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष बांधकामाची जबाबदारी खासगी कंत्राटदाराकडे सोपविली जाणार आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com