
ठाणे : नोकरीच्या शोधात आणि नोकरीनिमित्त ठाणे, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या जोडीला महिलाही येत आहे. या महिलांना राहण्याची माफक दरात व्यवस्था व्हावी, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या वसतिगृहात सुमारे ४०२ नोकरदार महिलांना राहता येणार आहे. अत्यंत माफक दरात वसतिगृह उपलब्ध होणार असून, यासाठी केंद्राकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.