esakal | बीएसयूपीतील बिऱ्हाडांवर ठाणे महापालिकेचा वॉच
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बीएसयूपीतील बिऱ्हाडांवर ठाणे महापालिकेचा वॉच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : बीएसयूपी (BSU) योजनेतील गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरीत्या बि-हाड थाटणाऱ्या बोगस सदनीकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला होता. ठाण्याच्या (Thane) धर्मवीर नगर येथील बीएसयूपी योजनेतील घरांचा हा घोटाळा चव्हाट्यावर येताच ठाणे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मनसेच्या (MNS) पाठपुराव्यानंतर प्रशासनाने आता बीएसयूपीतील घरांवर वॉच ठेवण्यासाठी थेट चौकशी समितीच नेमली आहे.

दरम्यान, अनेक अनधिकृत भाडेकरूंना नोटिसा बजावल्यानंतर त्यांनी बाहेरचा रस्ता घरला आहे; मात्र या घरांमध्ये काही वर्षांपासून ठाण मांडून राहणाऱ्या या भाडेकरूंचे भाडे नेमके 'खाल्ले' कोणी, कोणत्या अधिकाऱ्यांचा या घर भाडेकरूंवर वरदहस्त होता, या अनुत्तरित प्रश्नांचीही उत्तरे मिळायलाच हवीत, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे.

हेही वाचा: ठाणे महापालिकेचा ‘टीबीमुक्त' प्रयोग!

समितीच्या अध्यक्षपदी संजय हेरवाडे (अतिरिक्त हे असणार आयुक्त) असून समितीच्या सदस्यपदी अश्विनी वाघमळे (उपायुक्त स्थावर मालमत्ता), मनिष जोशी (उपायुक्त परिमंडळ १), वर्षा दीक्षित (उपायुक्त समाज (विकास विभाग), उपनगर अभियंता शहर विकास विभाग, महेश आहेर (कार्यालयीन अधीक्षक स्थावर मालमत्ता विभाग), कार्यकारी अभियंता बीएसयूपी कक्ष यांचा असणार आहे.

loading image
go to top