

मुंबई : ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत १८ जणांचा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी (ता. २) उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, वाहने तासन्तास रांगेत उभी असतात, त्यामुळे येथून प्रवास करणे दुःस्वप्न असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.