ST Employees Helps Farmers
ESakal
मुंबई
Thane News: एसटी कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिले 1 दिवसाचे वेतन
Kalyan ST Employees: अतिवृष्टी तसेच महापूरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे एसटीच्या कल्याण आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत केली आहे.
डोंबिवली : बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या कल्याण आगारातील 50 चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.

